बऱ्याचदा वाटतं... आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर.. की आपण इथे याआधी येऊन गेलोय! बऱ्याचदा असंही होतं.. की ही जी घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहे.. ती या आधीही घडून गेली आहे.. आपण त्याच जागेवर आहोत जेव्हा या आधी ही घटना घडली होती.. समोरची व्यक्ती वेगळी असेल कदाचित; पण ती हेच बोलली होती.. त्यावर आपण असेच react झालो होतो.. अजून तिसरं कोणी असेल तर त्यानी सुद्धा अशीच reaction दिली होती..
का होत असेल असं? आपली "cache memory " इतकी strong असते का? का हे फक्त भास असतात?? एखाद्या स्वप्नाप्रमाणे? स्वप्नं खरी होतीलच याची काहीच खात्री नसते.. भले आपण त्यासाठीच झटत असतो म्हणा.. असं म्हणतात की पहाटे पडलेली स्वप्नं खरी ठरतात.. पण मग हा "देजा-वू" चा अनुभव तर अगदी दिवसा-ढवळ्या येतो..डोळे उघडे असताना..
का??
तुम्हाला कधी होतं असं??
-omi
अरे खरंच रे! मलापण बर्याच वेळी असे वाटले आहे.
ReplyDeleteपण असे का घडते ते नाही समजले.
This comment has been removed by the author.
ReplyDelete@ animish : होतं असं कधी कधी....
ReplyDelete