वाटत कुठे तरी दूर निघून जावं...
तिथे असू आपण दोघंच..
नसतील स्वार्थी व्यावसायिक
नसतील अप्पलपोटे नातेवाईक
नसतील कसलेच पाश..
नसतील आपणच वाढवून ठेवलेल्या, जीवनावश्यक केलेल्या गरजा..
जुनं सगळं विसरून जाऊ..
नव्यानी सगळ्याला सामोरं जाऊ..
नव्याने एकमेकांत न्हाऊन जाऊ
आलं जुनं कोणी.. तर ओळख नाही द्यायची..
सरबराई मात्र सगळ्यांची यथोचित करायची..
लोकांची गरज बनून जाऊ..
गरजेपुरते जेऊ.. गरजेपुरते लेऊ..
गरजेपुरत्या जागेत माऊन जाऊ..
जाऊ जाऊ..
एक दिवस नक्की निघून जाऊ!
-omi
jatana kalaw..
ReplyDeletemi pan yetoy..
च्यायला हि हड्डी मध्ये पाहिजेच का..??
ReplyDeleteमस्त कविता..!!! वा म्हणजे वा च..!!
मस्त रे ! तशी जागा सापडली ना तर मला पण सांग :)
ReplyDeleteफ़ार गरज आहे तश्या जागेची
Masstch aahe re... khup chaan...
ReplyDeleteKhup sundar !! :)
ReplyDelete