Wednesday, January 25, 2012

Confused.. to the core...

आज सकाळी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तीच न्यूज flash होत होती..
मन बधीर झालं..
काय.. कोण.. काहीच कळेनासं झालं होतं..
साधारण पुढचा अर्धा तास कामात लक्षच लागलं नाही..
ऑफिसच्या बाल्कनी मध्ये कॉफी चा मग घेऊन उभा होतो..
मनात आलं.. की आयुष्य किती क्षणभंगूर आहे..
सकाळी घरून निघताना.. "येतो.." असं म्हणून गेलेले लोकं कधीच पुन्हा घरी परतणार नाहीत..?
A Wednesday पिक्चर आठवला..
आपण खूप लवकर used to होऊन जातो.. आता ही गोष्ट चांगली की वाईट हे काही मला कळत नाहीये..
आणि यंदा तर अतिरेक्यांना ही दोष देता येणार नाही..
आपल्या लोकांना फोन केला.. सगळे सुखरूप आहेत नं हे चेक केलं.. channel बदलून बदलून बघितलं की नक्की काय झालं.. थोड्याफार अफवा ऐकू आल्या.. "आपण" सुरक्षित आहोत नं? मग काय तर...
सकाळी पेपर मध्ये वाचू सगळं नीट..
इतका स्वार्थी झालोय मी??
आज सकाळी मी घरून निघालो तेव्हा नीलायम theatre पाशी traffic jam होतं..
एवढी लोकं थांबून बघतायत हे बघून मला वाटलं की एखादा accident झाला असेल.. किंवा शूटिंग चालू असेल...
आपल्याला कुठला आलाय वेळ???
सकाळी ९.३० वाजता कार्ड स्वाईप झालं पाहिजे.. या नादात मी पुढे गेलो..
आणि नंतर खरंच जाणवलं.. आईचा फोन आला.. पोचलास नं नीट? असं असं झालं म्हणे तुझ्या जायच्या रस्त्यावरच..
तेव्हा मी सुद्धा तुटक तुटक च बोललो आई शी.. काम महत्त्वाचं वाटलं मला तेव्हा...
आता कळतंय... मी खरंच खूप स्वार्थी वागलो.. रादर झालोय मी स्वार्थी.. स्वतःची आणि फक्त आपल्या लोकांचीच काळजी करावीशी वाटते मला हल्ली...
दुनिया गेली तेल लावत..
पण नंतर जेव्हा मी माझ्या ताई शी gtalk वरून बोललो तेव्हा खूप जास्त हेल्पलेस वाटलं...
ताई नी समजावायचा प्रयत्न केला.. मी ही समजून घ्यायचा प्रयत्न केला..
पण मी स्वार्थी झालोय हे नक्की..
पण मग स्वार्थी झालो तर मग मला हळहळ का वाटली??
डोकं सुन्न का झालं??
तो अर्धा तास मला युगासारखा वाटला??
घरी येताना त्याच रस्त्यावर २ मिनिट थांबावसं वाटलं.. पण नाही थांबलो..
घरी जायची ओढ लागली होती..
स्वार्थीपणा बोलवत होता..


I know this is a very confused post... but really, this is exactly what I am feeling.. right now..