सूर्या, मित्रा तुला एक सांगू का?
राग तर तुला येणार नाही ना?
रविवारी लवकर उठायची गरजच काय?
आमचे असतात ना अंथरुणात पाय!
तुझ्या आगमनाने उठतात माता पिता,
घालतात आम्हाला जोरात लाथा !
प्रसाद मिळाल्यावर मग उठावेच लागते ,
पहाटेच अभ्यासाला मग बसावेच लागते!
मध्येच डुलकी येते छोटी,
थोबाडीत चापटी मिळते मोठी!
खडबडून मग उठावेच लागते,
खरोखरीच पुस्तक वाचावेच लागते!
हाल करायला टपूनच असतोस,
का रे आम्हाला त्रास तू देतोस?
त्यापेक्षा रविवारी जास्त झोपत जा,
नऊ-दहा ला उगवत जा!! :)
निर्मिती - चारुता तेंडूलकर .... :)
@ चारुता : छान लिहिली आहेस.. नक्कीच!
ReplyDeleteमी तेवढा मोठा नाही.. आणि कवी तर नाहीच नाही.. पण लिहीत जा..
अनेक आशीर्वाद! :P
WANT TO SEE MORE STUFF COMING FROM YOU!
<3 YA!
hey... thnx alot!!! :)
ReplyDelete@चारुता farach chan !!!! God Bless You!!!!
ReplyDelete