Sunday, January 16, 2011

वेदना..


काय वाटतं तुम्हाला??
आयुष्यात असा कधी क्षण येतो का की तेव्हा आपल्या सगळ्या वेदना ठसठसणं थांबतं??? का हे दु:ख न संपणारं असतं??

माझं मत थोssssssडं वेगळं आहे.
असा एक क्षण खरंच येतो, की दुखत असलं तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.. पुन्हा कधीच दुखावले जाणार नाही असं समजून...
आपण त्या वेदनेला दोष देत नाही. भीती पण विरून गेलेली असते कारण आपलं मन अजून दुखावलं जाऊ शकत नाही. अजून आर्तता नाही येऊ शकत..
तेव्हा आपण बंद दाराला टेकून जमिनीवर बसतो.. समोरच्या त्या भिंतीकडे बघत.. हताशपणे.. गालावर एखादा अश्रू ओघळतो..

पण खरं सांगू??

तो रिकामेपणा.. ती पोकळी खूप आपलीशी वाटू लागते.. हवीहवीशी...
आपल्याला उभं राहायची इच्छा होतच नाही. कारण.. कदाचित.. 'आपल्याला जे हवं असतं ते त्या बंद दाराच्या बाहेर आपली वाट बघत असतं...' हे आपल्याला माहित असतं...

काही लोकांनी सांगितलंय मला.. त्यांना त्या जमिनीतून अंधार चढताना दिसतो.. खोलीमध्ये पसरतो.. आणि मग ते त्या अंधाराशी लढू शकत नाहीत.. मग अंधार त्यांचा ताबा घेतो.. आणि ते लोक अंधाराला त्यांचा ताबा घेऊ देतात..

खरं तर त्या क्षणी प्रकाशाचा एक कवडसा सुद्धा पुरतो. पण त्यांनाच तो नको असतो..

ते अंधाराला आपलंसं करतात..
प्रकाश संपतो. मन संपतं. आत्मा निघून जातो.
आणि..
त्या वेदनाही थांबतात..
कायमच्या...

बरोबर ना???


-omi

1 comment:

  1. Classic....
    very well written mitra!!!!
    Farch Chan!!!!!

    ReplyDelete