Monday, November 22, 2010

.....

बऱ्याचदा प्रश्न पडतो.. सुख म्हणजे नक्की काय?
मला विचारलंत... तर प्रत्येक क्षण जगण्यासारखा आहे! हा सुद्धा!!!
शुद्ध आणि पवित्र.. धमाल..
तू जेव्हा माझ्या शेजारी बसतेस ना.. काहीतरी नोट्स काढत.. त्या वेगळ्याच पद्धतीनी बसून.. तुझ्या स्टाईल नी.. नजर समोरच्या कागदावर.. मनात वेगळाच विचार.. 'साला हा प्रोब्लेम का सुटत नाहीये..' असं काहीतरी.. तुझं ते.. डोकं खाजवून आठवणं... पेन्सिल दातात धरून विचार करणं..
माझ्या टायपिंगचा आवाज ऐकून तुझ्या कपाळावर आलेली ती हलकी आठी..
मला हा क्षण सुद्धा खूप आवडतोय..
मी तुला distract न करण्याचा खूप प्रयत्न करतो मी.. पण तुझ्या चेहेऱ्यावरचे सतत बदलणारे भाव पाहून मी हरखून जातो.. तू जशी बसली आहेस..
I am just loving it...
हा क्षण कधी संपूच नये असं वाटत राहतं!
काही क्षण असतात.. प्रत्येकाच्या आयुष्यात... जे आयुष्याला एक चौकट देतात...
मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं आपल्याकडे बघून.. की या तरुण वयात सुद्धा आपण एकमेकांना इतकं छान समजून घेतो.. काळजी घेतो एकमेकांची.. एखाद्या आजी-आजोबांसारखी..
काही लोकं म्हणतात.. की म्हणे, तरुण जोडप्यांना कायम बोलायला हवं असतं.. सारखं काही ना काहीतरी करायला हवं असतं! तरुणांना शांत बसताच येत नाही..
पण खरं तर जेव्हा नातं प्रौढ होतं तेव्हा या गोष्टींची खरंच गरज भासत नाही..
आणि आपण दोघं त्याच रस्त्यावर आहोत.. प्रौढ नात्याच्या.. आणि इथे.. "वय doesn't matter!!!"
I like it!
माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर.. आणि हे तसंच राहील.. आपण एकत्र राहिलो.. न राहिलो.. पुन्हा एकमेकांना बघितलं अथवा नाही बघितलं तरीही..
.
.
.
.
.
काल मी हळूच कुशीवर वळलो..
तुला शांत झोप लागली की नाही हे बघायला..
मला खूप आवडतेस तू गाढ झोपलेली... शांत..
पण तू काल तशी नव्हतीस..
एक प्रकारची नाखुशी होती तुझ्या चेहेऱ्यावर!
गाढ झोपलेली असलीस तरी एक प्रकारची वेदना तुला जाणवत होती..
मला खूप काळजी वाटली तेव्हा.. एक रुखरुख लागली.. तुला गाढ शांत झोप लागली की नाही याची..
मला खूप hurt होतं तुला असं बघितलं की..
तुझ्या सगळ्या वेदना मला मिळाव्यात अशी मी मनोमन प्रार्थना करतो..
.
.
.
.
असंच एकदा तू ही मला बघतेस.. माझ्या गाढ झोपेच्या वेळेस..
तुला ते जाणवतं की मी खरंच झोपलोय.. की दमलोय.. की कंटाळून डोळे मिटून घेतोय..
पण मी तुला खात्री देतो.. मी खरंच खूप सुखात आहे.. कारण माझ्याकडे "तू" आहेस!
मला खरंच तुझ्याकडून अजून काही नकोय!
कधी कधी वाटतं अशाच क्षणांचं का नाहीये संपूर्ण आयुष्य??
जग बदलतंय.. खूप वेगानी..
म्हणूनच कदाचित.. पण मला तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण जपून ठेवायचा आहे!
कारण माझ्यासाठी हेच सुख आहे!
तू मला कपाळावर थोपटतेस.... आणि मला तशीच छान गाढ झोप लागते.. त्या क्षणीच!
दमलो म्हणून नाही.. शांत झालो.. समाधानी झालो म्हणून..
तू आसपास असलीस ना.. की असंच वाटतं.. शांत.. समाधानी..
पण आता झोपेन मी.. सुखात.. समाधानानी..
आणि माझ्या श्वासातले शब्द कळतील तुला.. तेवढं "mature" आहे आपलं नातं...
“I Love You”.


-omi

5 comments:

  1. surekh.....pan are babdya...he asa jagjaahir kelya peksha pratyaksha tila bol ki....aani ha sanvaad fakta tumha doghan madhe asu det....tyacha godva kahi nirala aahe....aaj ti tujhya javal asel kiva nasel...pan ha tumcha to "private" moment aahe jo tumha doghani ayushya bhar cherish karaychay...tyacha blog banvu nakos baala

    ReplyDelete
  2. @ Komal : :) its a past! so.. :)

    ReplyDelete
  3. एकदम मस्त...आवडला
    Keep it up...
    पण ही सत्यकथा आहे की कल्पना???

    ReplyDelete
  4. क्षणात विसरभोळी होणारी नाती,
    माणुसकी सोडून जपलेल्या सगळ्या जाती,
    निरांजानावर सगळ्या विझलेल्याच वाती,
    गाभाऱ्यातल्या त्या वातीच काजळ मिळालं तरी ठीक...

    कोणी भीक देताय का भीक?
    पैशांची नकोय अजिबात,
    आप्तांची थोडी आठवण मिळाली तरी ठीक...
    कोणी भीक देताय का भीक?

    आजकालचा काळ असाच आहे... हे प्रेम कालचं , हे प्रेम आजचं... परिस्थिती अशीच आहे आज...
    ह्या सगळ्या क्लब-पब-पार्टी, छंदी-फंदी "रहाटगाडग्यामध्ये" कोणाला असं, एवढं प्रेम होऊ शकतं (किंवा असू शकतं) ही कल्पना केली तरी अंगावर शहारा येतो.

    "तुझ्या-माझ्या मैत्रीत असं काय वेगळंय तेच मला कळत नाही,
    कदाचित आपण आपलीच सुख-दुखः सारखी दळत बसत नाही !!"

    प्रेमाची सुरुवात अशी व्हायला पाहिजे आणि शेवट सुद्धा असाच व्हायला पाहिजे...
    (असं मला वाटतं)

    आणि आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाबद्दल म्हणशील तर...
    "आजकाल येणारा प्रत्येक क्षण हळूच तुझी चाहूल देतो,
    प्रेम वगैरे शब्द ऐकले की मी एक पाऊल मागेच घेतो..."

    असो.. लिहिण्यासारखं खूप आहे.. पण आज मूड नाहीये... पुन्हा कधीतरी... :-)

    ReplyDelete