Saturday, November 6, 2010

कधी कधी...

कधी कधी... रुक्षपणाच बरा वाटतो!
कधी कधी... एखादा अंधारा कोपराच छान आपलासा वाटतो!
कधी कधी... रडायचं नसलं तरी डोळ्यातून अश्रू ओघळतात!
कधी कधी... काळजीपोटी आलेले शब्द सुद्धा सुयांसारखे बोचतात!
कधी कधी... स्वप्न भविष्यात मानगुटीवर भुतासारखी बसतात!
कधी कधी... सगळंच सोडून द्यावसं वाटतं!
कधी कधी... आयुष्यात यशापेक्षा खाचखळगेच जास्त आहेत असं वाटतं!
कधी कधी... कितीही काळजी घेतली तरीही पडावंच लागतं!
कधी कधी... आपण जसे आहोत तसे राहणं खूप तोट्याचं असतं!
कधी कधी... खूप खूप एकाकी रहावसं वाटतं!
कधी कधी...


-omi

1 comment: