Tuesday, April 26, 2011
....
असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो.. तिथे सगळी नाती संपतात.. विरून जातात.. तिथे फक्त आपण असतो.. आणि तो.. वरचा.. कोणी आई नाही.. कोणी वडील नाही.. कोणी भाऊ नाही.. कोणी बहीण नाही... कोणी मित्रही नाही..
आणि तिथेच जाणवतं आपल्याला.. आपल्या पायाखाली ना जमीन आहे... ना डोक्यावर आकाश.. त्या निरंतर पोकळीत फक्त त्याचंच अस्तित्व आहे.. तिथे लायकी कळते.... आपण किती क्षुल्लक आहोत हे जाणवतं.. मग कळून चुकतं.. आपण असलो काय आणि नसलो काय.. काहीच फरक पडत नाही.. असं झालं की आपल्या अहंकाराचा मुखवटा गळून पडतो... जगात काहीच फरक पडत नाही.. कोणालाच काहीच वाटत नाही!
आणि माझं ऐकाल, तर असा क्षण आयुष्यात लवकरात लवकर आलेला चांगला..
खूप सोपं आणि शांत होऊन जाईल.. सगळंच!!!
PS : गगनबावडा घाटातून जाताना सह्याद्रीची भव्यता अनुभवायला मिळाली.. मला स्वतःची लायकी कळली..
Labels:
omkarkukade,
panorama,
realization,
spiritual
Subscribe to:
Post Comments (Atom)
ह्म्म्म....खरे आहे हे....आवडले...!!!!
ReplyDelete