Saturday, March 26, 2011

एक सांगू? ऐकशील??


एक सांगू? ऐकशील??
तू ना... मला खूप आवडतेस...
थोडी चंचल.. थोडी गुमसुम....
कधी ना... खरंच वेडी वाटतेस...
एक सांगू? ऐकशील??
तू ना..मला खूप आवडतेस...

तसे आवडणारे बरेच आहेत..
पण तुझ्यात ना.. "वोह" बात है यार!
तू ना अगं.... कशी "आपली" वाटतेस...
एक सांगू? ऐकशील??
तू ना.. मला खूप आवडतेस...

हे तुझं पटकन गोष्टी विसरणं...
बोलता बोलता मधेच "जाऊ दे.. सोड..." असं म्हणणं...
मला कळतच नाही तुझं असं बोलणं..
का सांगत नाहीस मला??
माहित नाही कुठल्या धुंदीत असतेस...
एक सांगू? ऐकशील??
तू ना.. मला खूप आवडतेस...

2 comments:

  1. Changlay...pan much more is expected from u....m not being harsh, but u can do it n I wanna see it :)

    ReplyDelete
  2. @komal : thanks.. एका level ची अपेक्षा ठेवल्याबद्दल.. will improve.. actually its about my best friend... and she kinda liked it.. as it had some references.. :) so..

    but this can't be an excuse..
    will surely improve!! :)

    ReplyDelete