Wednesday, March 2, 2011

तू.. आणि पाऊस...


ह्या पावसाच्या सरी पण ना..
अगदी तुझ्यासारख्याच...

आल्या तर प्रसन्न वाटतं..
नाही आल्या तर खूप रुक्ष वाटतं..
कधी न सांगता येतात...
कधी कधी रोज भेटत राहतात...

कधी धुवांधार.. कधी शांत..
ह्या पावसाच्या सरी पण ना..
अगदी तुझ्यासारख्याच...

कधी आठवणीत.. कधी रात्रीच्या शांततेत..
ह्या पावसाच्या सरी पण ना..
अगदी तुझ्यासारख्याच...

प्रत्येक थेंबात जगण्याची नवीन आस..
ह्या पावसाच्या सरी पण ना..
अगदी तुझ्यासारख्याच...

2 comments:

  1. Ek number...
    'आल्या तर प्रसन्न वाटतं..
    नाही आल्या तर खूप रुक्ष वाटतं..
    कधी न सांगता येतात...
    कधी कधी रोज भेटत राहतात...'

    Khupach bhaari

    ReplyDelete
  2. मस्त लिहिलेय, असेच लिहीत राहा

    ReplyDelete