Tuesday, May 17, 2011

कधीच....


या चंद्राबरोबर इतकाही बोलत नव्हतो मी..
कधीच...
रात्रही होतच होती की रोज... पण इतकीही सुंदर नव्हती..
कधीच..

तुझ्या आठवणीत ती रात्रही भेटली होती.. कालच..
रात्र तीच होती..
पण ती भेट सुद्धा आपल्या भेटीसारखी "भेट" नव्हती...
कधीच..

हम्म... त्या भेटीत सुद्धा ती "उदासी" होती म्हणा..
चंद्र तारे सुद्धा तसेच होते..
पण त्यांच्याशी बोलणं आपल्या गप्पांसारखं नव्हतं..
कधीच...

तुझ्या प्रेमानी क्षणात जग बदलून गेल्यासारखं वाटतंय..
मला जाणवतंय...
मी असा नव्हतो..
कधीच....

No comments:

Post a Comment