Tuesday, June 28, 2011

२ कप्पे...


म्हणतात नं..
हृदयाचे २ कप्पे असतात..
एक.. रक्त पुरवठा वगैरे कामं करण्यासाठी...
आणि दुसरा.. प्रेम करण्यासाठी..
..
एक.. कधी रडण्यासाठी..
आणि दुसरा.. कधी प्रेमाचा सुगंध पसरवण्यासाठी..
..
एक.. आकाशाएवढा विशाल..
दुसरा.. धरणीसारखा.. शांत.. शीतल.. कणखर..
..
एक.. गारवा देणारा..
दुसरा.. प्रेमाची उब देणारा..
..
एक.. अज्ञात हळूवार लाट..
दुसरा.. मऊशार वाळूचा काठ..
..
एक.. सुरेख बांधणीचं पुस्तक..
दुसरा.. एक हवंहवंसं मृगजळ...
..
एक.. टवटवीत फुलांचा ताटवा..
दुसरा.. एक चमचमता काजवा..
..
एक.. जुनी न भरलेली जखम...
दुसरा.. नुकताच झालेला एक घाव..
..

या जखमांना हात नसतो लावायचा..
खपली पडायची भीती असते...
पण हो..
जिच्याकडे माझं हृदय आहे,
तिच्याकडेच आहे सगळं..
स्वप्नं.. इच्छा.. आकांक्षा.. आशा..
आणि आमच्या सुखाच्या दालनाच्या किल्ल्या..
कायमच्या..



love you!

-omi

1 comment: