Monday, June 20, 2011

ती.. एक राजकन्या...


एक सुंदर रात्र... चंद्राळलेली..
तेव्हा दिसली ती..

ती.. एक राजकन्या...
हसतमुख.. चेहेऱ्यावर तेज..
पाहताक्षणीच आवडली..
डोळ्यातून अलगद काळजात उतरली..
पापण्यांच्या दारातून.. हलकेच..
देवाकडे एकच मागणं..
ती मला मिळू दे..
आणि तिचीही हीच इच्छा असू दे..

ती.. एक राजकन्या...
वातावरण भारून जातं तिच्या येण्यानी..
मातीचा सुगंध दरवळतो..
आभाळ निळाशार होतं..
आसमंत जादुई गुलाबी होतं...
खात्री आहे मला..
मी अशी व्यक्ती कधी बघितली नव्हती..

पुन्हा तीच इच्छा..
ती मला मिळू दे..
आणि तिचीही हीच इच्छा असू दे..

स्वप्नांचं एक घर बांधू..
आणि त्याच्या भिंती आपल्या प्रेमानीच रंगवू..
दिवस असतील प्रेमाचे..
रात्री असतील दवबिंदूसारख्या सुंदर..

असं खुलेल प्रेम जसा की एक चंद्र..
ताऱ्यांच्या मांदियाळीतला..

एकच मागणं..
मला ती मिळू दे..
आणि तिचीही हीच इच्छा असू दे..



love you dear.. a lot..


-omi

2 comments:

  1. man..... .. ya poem asel tar tu confused watatos........means baryach wela asambadhdh, watale........ means tujhi feelings yatun kalat nahiyet............. sry jar rude asel tar bt.... ...
    no offence

    ReplyDelete
  2. thanks for a true reply.. :) liked it.. i know its not among the best. but the person and inspiration behind it, is the closest one... i agree with your points.. :)
    will take care..

    ani hi kavita mhanun lihili nahi.. manaat alele vichar mandle ahet.. sahaj..

    ReplyDelete