सलग ३-४ दिवसांच्या रिप- रिपीनंतर पावसानी आज जरा उघडीप दिली..सकाळी घराच्या बाल्कनीमधून बाहेर बघितलं तेव्हा पाऊस शांत झाला होता..आभाळातून पडणारा पाणी पिऊन झाडं तृप्त झाली होती.. एक वेगळाच "फ्रेश" असा हिरवा रंग परिधान केलेली झाडांची शिखरं.. नारळाच्या झापेवरून एका ठराविक वेळानंतर पडत असणारे मोत्यासारखे पाण्याचे थेंब... आणि तेवढ्यात चेहेऱ्यावर आलेली उन्हाची सुंदरशी तिरीप.. सकाळी १० वाजताच ऊन सुद्धा कोवळं वाटावं असं ते वातावरण.. कुंद-धुंद असं काहीतरी म्हणतात ना.. तसा काहीतरी.. "फ्रेश"....
तेवढ्यात माझं लक्ष त्या नारळाच्या झाडावर चढणाऱ्या खारुताईकडे गेलं.. ती सुद्धा थोडी भिजलेलीच होती.. ती सरसर वर चढत गेली.. पण मधेच जवळजवळ ३-४ मिनिट थांबली.. ती रोज दिसायची.. तिथेच.. फक्त ती नारळाच्या झाडाची खोडं कोरडी असायची.. पण..
माझ्या एका हातात गरम कॉफीचा मग होता.. आईच्या २-३ वेळा हाका आल्या.. पण मी बाल्कनीमधून घरात जाण्याच्या मनस्थितीत नव्हतो.. आता आज ती का थांबली याची मला उत्सुकता वाटू लागली..
ती २-३ फूट अजून पुढे गेली.. तेव्हा त्या खारीच पिल्लू तिथे अडकून पडलं होतं असं माझ्या लक्षात आलं... मग त्या खारीतला पालकत्वाचा "gene " जागा झाला असेल.. कारण त्या पिल्लाला पाठीवर घेऊन ती तितक्याच सहजतेनी ते झाड उतरली.. आणि दुसऱ्या झाडावर गेली..
३-४ दिवसांच्या पावसामुळे त्यांची भेट झाली नसेल.. कदाचित त्या पिल्लांनी काही खाल्लं सुद्धा नसेल.. कदाचित त्या दुसऱ्या झाडावरून ती आई खार त्या पिल्लाकडे नुसती बघत असेल.. पण ती सुद्धा असहाय असेल.. शेवटी "खारीचा" जीव तिचा.. ती तरी किती धाडस करणार..!
पण म्हणजे... "जीवन" देणारा पाऊस इतका "रौद्र" असू शकतो...???
-omi
awesome ...kiti thoughtful ..astonishing observation
ReplyDelete