Wednesday, June 30, 2010

स्वभाव.. आणि "आपली" माणसं....

माणसं बदलतात... पण स्वभावाचं काय? स्वभाव तसाच राहत असेल ना? फार पूर्वीपासून ऐकत आलोय आपण.. स्वभावाला औषध नाही.. पण मग.. हसती खेळती.. आत्ता आत्तापर्यंत नीट बोलणारी माणसं अशी अचानक का बदलतात? १८० डिग्री च्या कोनातून का वळतात.. पाठ फिरवतात? कधी कधी वाटतं.. मी चुकतोय का? मग रात्रीची झोप उडते.. भूक लागत नाही.. तहान लागत नाही.. काही केल्या मनातून "तो" विचार जातच नाही.
ती माणसं आपल्यापासून लांब जातात. कारण कधीतरी का होईना.. ती सगळी आपल्या जवळ असतात.. ती अंतरं कमी करणं खरंच आपल्या हातात असतं का? का आपण आणि समोरचा तो.. "misunderstanding " चे शिकार असतो??
पण जर खूपच मोठं भांडण झालं आणि समोरचा आपल्याशी संबंधच तोडायला निघाला तर?? ही "misunderstandings " समोरासमोर बसून सोडवणं गरजेचं नाही का? आयुष्यात पुढे जाताना माणसं जोडत जायचं की तोडत जायचं?
मग कितीही मोठे व्हा रे.. अगदी टाटा बिर्ला ला टक्कर द्या.. पण जर मेल्यानंतर जर तुम्हाला खांदा द्यायला ४ जण पुढे येणार नसतील तर दारात उभ्या असलेल्या चार चाकी गाडीचा काहीही उपयोग नाही..
थोडसं परखड बोलतोय.. पण जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला "decode " करता येत नसेल तर तुम्हाला श्रीमंत होण्याचा, प्रगती करण्याचा काहीही हक्क नाही.. आणि हे आपण सगळ्यांनी लक्षत घ्यायला हवं.. कळत-नकळत आपण कोणाला दुखावत नाही ना.. याची काळजी घ्यायला हवी..
आणि सगळ्यात महत्त्वाचं.. आपल्या वागण्यामुळे कोणी आपल्यावर "असा" blog लिहिणार नाही ना.. याची काळजी घ्यायला हवी...